?
Ask Question
२९ वर्षाच्या युवक ,त्याने वेट लिफ्टींग केल्या नंतर अचानक त्याच्या कमरेखाली दुखायला सुरु झाले. काही काळ तो तसाच दुखणे कमी होईल म्हणुन वाट पाहु लागला पण वेदना असह्य झाल्यानंतर मात्र तो डाॅक्टरांकडे गेला, डाॅक्टरनी त्याला अनालजेसिक गोळी दिली आणी पाठवले,पण गोळी घेऊनही वेदना काही शमत नव्हत्या ,रात्रभर त्याने कशातरी त्या वेदना सहन केल्या व पुन्हा डाॅक्टरांकडे गेला, डाॅक्टरनी मुतखडा असल्याचे निदान केले व तो तिथे ॲडमीट झाला, काही औषध उपचार करुन त्याला डिसचार्ज दिला पण तरीही वेदना थांबत नव्हत्या, शिवाय त्याला प्रचंड डोकेदुखी सुरु झाली शिवाय त्याचा रक्तदाब घातक रित्या वाढु लागला.तेव्हा मग या युवकाच्या घरच्यांनी त्याला मिरजेला डाॅक्टर लोकुर सरांकडे आणले , डाॅक्टर लोकुर सरांनी त्याची सोनोग्राफी केली पण सोनोग्राफी मध्ये त्याचे दुखणे हे मुतखडा असण्याची शक्यता नसल्याचे जाणवले म्हणुन सिटी स्कॅन केले....सिटी स्कॅन मध्ये किडनीच्या रक्तवाहीनीचा दोष आढळला म्हणुन त्यांनी या युवकांला माझ्याकडे पाठवले( Dr. Yogesh Jamage, Miraj) मी त्याची एन्जिओग्रीफी केली तेव्हा त्याच्या एन्जिओग्राफी मध्ये त्याच्या उजव्या किडनीच्या बाजुची रक्तवाहीनीचे आवरण आतुन अक्षरश: फाटल्याचे निदान झाले. व रक्तवाहीनी मध्ये ९०% ब्लाॅक आढळला व शिवाय त्याचा रक्तदाबही अतिशय वाढत चालला होता ॲन्टीहायपरटेन्शच्या ३ गोळ्या देऊन पण तो स्थिर होत नव्हता
तेव्हा मी त्यांच्या नातेवाईकांना तातडीने एन्जिओप्लास्टी करावी लागेल असे सांगितले त्याच्या नातेवाईकांनी त्याला परवानगी दिली तसा त्याला तातडीने वाॅनलेस हाॅस्पीटल मिरज येथे दाखल केले व त्याची फाटलेल्या रक्तवाहीनीचे आवरण बंदल केले व ब्लाॅक काढला म्हणजेच एन्जिओप्लास्टी करुन त्याचा रक्तपुरवठा सुरळीत केला.त्यानंतर मात्र त्याला बरे वाटु लागले आणी त्याच्या वेदना आता पुर्ण शमल्या होत्या तिव्र डोकेदुखीही थांबली होती आणी रक्तदाबही आता नियमीत होता तो ठणठणीत झाल्यावर त्याला डिसचार्ज दिला ३ महीन्यानंतर जेव्हा तो फाॅलोअप अप साठी आला तेव्हा त्याला कोणताही त्रास नव्हता व रक्तदाब सुध्दा कुठल्याही औषधीविणा व्यवस्थित आहे. या केस मधे थोडा जरी उशीर झाला असता तर त्याचा जो अनियमित पणे वाढत चाललेला रक्तदाब होता तो अतिशय घातक ठरला असता. हा रक्तदाब कशामुळे वाढत असेल तर याच कारण असं आहे की रक्तवाहीनी ब्लाॅक असल्यामुळे किडनीला रक्तपुरवठा कमी होत होता . पण योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्याने त्याच्यावरील विघ्न टळलं होतं
हा युवक कर्नाटक मधुन आला होता त्यामुळे त्याच्यावर वाॅन्लेस हाॅस्पिटल मध्ये वाजपेयी योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात आले.

Rare case with rare presentation in COVID-19 pandemic
AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer