एल आय सी एजन्ट म्हणुन काम करणार्या ३५ वर्षाच्या युवकाला कोव्हीड नी गाठलं. त्यामुळे तो युवक कोव्हीड केअर सेंटर मध्ये ॲडमीट झाला. तिथे १४ दिवस औषध उपचार घेतल्यानंतर हा युवक बरा झाला, आणी तिथुन त्याला डिसचार्ज मिळाला व तो घरी परतला, घरी परतल्याचा आनंद होताच कारण माहामारीतुन धडधाकट होऊन परत आला होता, पण हा आनंद फार काळ टिकला नाही. घरी आल्या नंतर तिसर्याच दिवशी त्याला अस्वस्थ वाटु लागलं, छातीत दुखु लागलं. म्हणुन हा युवक फिजीशीयन कडे गेला , फिजीशियन डाॅक्टर नी त्याचा ईसीजी केला, तेव्हा इसीजी मध्ये त्याला हार्ट ॲटॅक (Heart Attack) चालु असल्याच स्पष्ट झालं , तेव्हा फिजीशियन डाॅक्टर नी त्याला त्वरित माझ्याकडे पाठवले(
Dr. Yogesh Jamage - Cardiologist) मी या युवकाला त्वरित भारती हाॅस्पिटल मध्ये शिफ्ट केल. आणी त्याला त्वरित रक्त पातळ होण्याची औषधे सुरु केली. जेणेकरुन त्याच्या छातीत दुखणं कमी होईल. पण या औषधांचा या युवकांवर काही परिणाम झाला नाही. त्याच्या छातीत दुखणं चालुच होतं. म्हणुन मी त्याची त्वरित एन्जिओग्राफी केली , तर एन्जिओग्राफी मध्ये त्याचा डाव्या बाजुच्या रक्तवाहीनी मध्ये १००% ब्लाॅक आढळून आला. म्हणुन त्यांच्यावर मी बलुन एन्जिओप्लास्टी केली तरि पण रक्तवाहीनी मध्ये ब्लाॅक होता. रक्ताच्या गुठळ्या कमी करण्यास रक्तपातळ होण्याची औषधे रक्तवाहीनी मध्ये (Intracoronary Tirofiban)दिले. तेव्हा तिथे स्टेन्ट घातला असता तर अजुन रक्ताच्या गुठळ्या वाढल्या असत्या त्यामुळे मी स्टेन्ट न घालता रक्तपातळ होण्याची औषधे (Heparin) सुरु केली. पण कोरोना मुळे त्याच्या रक्ताच्या गुठळ्या होण थांबतच नव्हत्या. कारण सध्या कोव्हीड रुग्णांना रक्ताच्या गुठळ्या होणे या समस्या जाणवत आहेत .