?
Ask Question
पाचेगाव ( सोलापुर जिल्हा) इथुन ही ताई Cardiologist -  Dr. Yogesh Jamage कडे तिचा हात दुखतोय ही तक्रार घेऊन आली. प्राथमिक तपासणीतील चौकशी केली असता समजले की  उजवा हात दुखीचा त्रास गेल्या दोन वर्षापासुन होता तिला.  हात थंड पडायचा, सुजायचा, कोणत्या संवेदनाच त्या मध्ये नसायच्या या दोन वर्षात अनेक तपासण्या , अनेक उपचार तिच्यावर झालेले होते पण उपचारापुरतं तिला बरं वाटायचं पुन्हा हात दुखीचं दुखणं वर काढायचं. ठोस असं निदान झालेलंच नव्हतं , कुणी सांधेवाई आहे म्हणुन उपचार केले तर तर हाडाचं दुखणं आहे म्हणुन उपचार केले. उपचार व्हायचे पण त्या उपचारांचा ईलाज मात्र तिच्यावर होत नव्हता. एक तर उजवा हात त्यात संसारी बाई.... संसारी बाई ला हात कामासाठी झपाझप चालवावे लागतात नाहीतर मग काही खरं नसतं. 

Case study of Patient - Dr. Yogesh Jamage

हळुहळु या ताईच्या हाताची बोटं काळी पडु लागलेली हीच काळी झालेली बोटं घेऊन ती माझ्या ओपीडी मध्ये माझ्यासमोर बसली होती. तिचा हात पाहीला, काळी पडत  जाणारी बोटं पाहीली तेव्हा लक्षात आलं सांधेवाई किंवा हाडाच दुखणं नक्कीच नव्हतं तर हाताला गॅंगरीन ने घेरलं होतं .... गॅंगरीन ने आत्ताकुठे बोटापासुन सुरवात केली होती . जास्त वेळ घालवून चालणार नव्हता नाहीतर हात कापायची वेळ लांब नव्हती. या ताई सोबत तिचा नवरा होता या दोघांना मी त्याची कल्पना दिली. पण गॅंगरीन का आणि कशामुळे असा गांगरलेल्या भेदरलेल्या चेहर्यावर प्रश्न होता. पहीला त्यांना हात किंवा बोटं कापावी लागणार नाहीत यासाठी दिलासा दिला. नक्की काय कारण आहे असं होण्याचं हातामध्ये कुठली रक्तवाहीनी ब्लाॅक झालिये का पाहु आपण म्हणुन प्रथम ॲन्जिओग्राफी करुन पाहु म्हणालो व तसे या ताईंना भारती हाॅस्पीटल मध्ये ॲडमीट होण्यासाठी सांगीतले त्या ॲडमीट झाल्या त्यांची ॲन्जिओग्राफी केली तर ॲन्जिओग्राफी मध्ये लक्षात आलं हाताची रक्तवाहीनी १००%ब्लाॅक झालीए ज्याला वैद्यकीय भाषेत (ब्रॅकियल आर्टरी ब्लाॅक ) म्हणतात हा प्रकार या ताईच्या बाबतीत झाला होता आणि गॅंगरीन ने हात घेरायचं हेच मोठ्ठ कारण होतं.म्हणुन ॲन्जिओप्लास्टी करुन हा ब्लाॅक म्हणजेच जी रक्ताचा गुठळ्या होऊन हातामध्ये थांबलेला रक्तप्रवाह सुरळीत करणं गरजेच होतं म्हणुन तशी  हाताची ॲन्जिओप्लास्टी केली आणि रक्तप्रवाह सुरळीत केला.... दोन दिवसातच त्यांची हातदुखी थांबली आणि हळुहळु त्यांना हातामध्ये संवेदना जाणवु लागल्या ताई डिसचार्ज घेऊन घरी परतल्या आणि महीन्याभराने माझ्या कडे फाॅलोअप साठी आल्या तेव्हा त्यांचा चेहरा प्रसन्न दिसत होता त्यांच्या हाताची जी काळी पडलेली बोटं होती ती पुन्हा पुर्ववत झाली होती म्हणजेच त्यांचा गॅंगरीन हा पुर्णपणे नाहीसा झालेला होता.आपला हात गॅंगरीन झाल्याने काढावा लागणार या धास्तीने त्यांचा जीव  अर्धा झाला होता तो आता हा ताचा गॅंगरीन पुर्ण बरा झाला आहे तुम्ही जाऊन नविन बांगड्यां घाला हे सांगीतल्यावर त्या ताईच्या चेहर्यावर आनंद मावत नव्हता
AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer