धकाधकीच जीवन , वाढलेली स्पर्धा, गगनचुंबी महत्वाकांक्षा , आणी ध्येय गाठण्यासाठी त्यामागे आपले मन प्रचंड वेगान धावत असतं आणी तेवढ्या वेगात आपल्या शरीराला पण आपण पळवायचा प्रयत्न करतो, आणी निसर्ग नियमाच्या विरोधात जातो. आणी तिथेच सारा डाव उलटतो. ध्येयामागे धावताना आपण आपल्या आरोग्याचा विचार जवळपास करतच नाही. अगदी असचं घडलं प्रसाद च्या बाबतीत. २८ वर्षांचा उमदा तरुण प्रसाद, व्यवसायाने काॅन्ट्रॅक्टर. त्यामुळे त्याच काम सतत उन्हातान्हात, एकासाईट वरुन दुसर्या साईट वर, दुसर्या वरुन तिसर्या अशी नुसती धडपड असायची. वेळेवर खाणपिण नाही की व्यायाम नाही. सतत कामाच्या मागे धावणं , आणी त्या धावाण्याला काही काळवेळही नव्हता. रात्री अपरात्री पर्यंत साईट वर कामं चालायची. त्यामुळे योग्य आहार , योग्य त्या वेळेत आहार याचं गणीतच कधी जुळलेलं नव्हतं त्यांच अलिकडे कितीतरी महीन्यात.१७ डिंसेबर २०१८ ला रात्री दोन वाजता प्रसाद घरी आला, झोपला. रात्री त्याच्या छातीत जळजळत असल्याच जाणवलं म्हणुन त्यांन स्वत:जवळच्या गोळ्या घेतल्या आणी झोपला. पण झोप काही लागेना प्रचंड अस्वस्थ जाणवु लागलं. म्हणुन प्रसाद गावातल्या डाॅक्टरांकडे पहाटे पाच वाजता गेला. डाॅक्टरनी प्रसादची तपासणी केली. डाॅक्टरना थोडी शंका वाटली म्हणुन त्याचा ई सी जी केला आणी लगेच तो वाॅट्स ॲप वरुन मिरजेतील
Cardiologist Dr. Yogesh Jamage यांना पाठवला. व तसे त्यांना फोनवरुन कळवले. डाॅ योगेश नी वाॅट्स ॲप वर ई सी जी पाहीला तसे डाॅ योगेश ना लक्षात आले की पेशंट ला हार्ट ॲटॅक चालु आहे. तेव्हा डाॅ योगेश यांनी तातडीने प्रसाद ला भारती हाॅस्पीटल मधे घेऊन येण्यासाठी सांगीतले व ते स्वत:सुध्दा घरातून तत्परतेने भारती हाॅस्पीटलमधे निघाले. पेशंट पोहचण्याआधी डाॅ. योगेश पुर्ण तयारीनिशी तिथे हजर होते इतक्यात प्रसाद ला घेऊन त्याचे नातेवाईक आले. डाॅ योगेश नी त्याचा इको केला त्यामधे फक्त २८ वर्षांचा असलेल्या प्रसाद ला हार्ट ॲटॅक आल्याच निदान झालं. डाॅ योगेश नी त्याला तत्परतेने गरजेची औषधे देऊन उपचार चालु केले व त्वरित ॲन्जीओग्राफी करण्याचा निर्णय घेतला.ॲन्जीओग्राफी मधे प्रसाद च्या ह्दयात ९९% ब्लाॅकेजीस असल्यास आढळले. त्याच्या ह्दयातील दोन मुख्य रक्तवाहीन्यामधे जिथुन रक्तप्रवाह संपुर्ण ह्दयाला होतो त्या रक्तवाहीन्या ब्लाॅक झाल्याच आढळून आलं. एकुणच ॲन्जीग्राफीचे रिपोर्ट्स पाहता प्रसादला एक दोन स्टेन्ट घालुन त्याच्यावर ॲन्जिओप्लास्टी करुन भागणार्यातलं नव्हतं इतकं ते ह्दय रक्ताच्या गुठळ्यानी ब्लाॅक झालं होतं आणी त्यांच वयं पाहता ॲन्जीओप्लास्टी करुन त्याला आयुष्यभर औषधांचा सोबती करणं हे सुध्दा घातकचं होतं . पण ही वेळ योग्य निर्णय घेण्याची होती. कारण एक सळसळत रक्त असलेला उमदा तरुण जिवनमरणाच्या दारात होता. तेव्हा डाॅक्टरनी प्रसाद थ्रंबोलाईसीस पध्दतीने उपचार द्यायचे ठरवुन कुठलीही शस्रक्रिया न करता मेडिकल मॅनेजमेंट वर प्रसाद चा ह्दयविकार अटोक्यात आणायची चुटकीसरशी निर्णय घेतला. आणी त्यांवर उपचार चालु केले.प्रसाद ला रक्त पातळ होण्याची औषधं व त्यासोबत इतर महत्वाची औषधं व सलाईन सुरु केले. व त्याला आयसीयु मधे दाखलं केलं थोड्या वेळाने , धडपडत असलेला प्रसाद स्टेबल झाला. आणी त्यांच्यावर पुढे सात दिवस डाॅ योगेश यांनी त्यांच्यावर उपचार केले. आता प्रसादला पूर्णपणे बरे वाटु लागले तेव्हा त्याला आयसीयु मधुन रुम मध्ये शिफ्ट केले. पुन्हा एकदा त्याची ॲन्जीओग्राफी केली असता त्याच्या ह्दयातील सगळे ब्लाॅकेजीस पुर्णपणे निघुन जाऊन व्यवस्थीत नैसर्गिक पणे रक्तप्रवाह चालु असल्याच दिसलं. तेव्हा डाॅ योगेश नी विजयीमुद्रेनी प्रसाद कडे पाहीलं आणी त्याला मजेत म्हणाले प्रसाद साहेब सळसळत रक्त आहे की तुमचं .....आता उठा आणी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊन पुन्हा सळसळत्या उत्साहानी कामाला लागा.


या सात दिवसात प्रसाद आरोग्याची सुधारणा कुठल्याही शस्रक्रिये शिवाय झाली होती पण आपल्याला इतक्या लहान वयात हार्ट अॅटॅक आला या जाणीवेनेच प्रसाद हादरुन गेला होता. पण आज डाॅक्टर याेगेशनी मात्र फक्त उपचारचं नाहीत तर आयुष्यात नव्याने उभं राहण्यासाठी एक नविन आत्मविश्वास पण दिला होता. स्ट्रेचर वर आलेला एक तरुण डिसचार्ज घेऊन जाताना मात्र हसर्या चेहर्याने एका सळसळत्या आत्मविश्वासाने ,उत्साहाने सुखरुप घरी पोहचला. आणी ते हास्य, तो आत्मविश्वास,तो उत्साह डाॅक्टर योगेश नी त्याला बहाल केला होता.