नेताजी काकांना बर्याच वर्षांपासुन शुगर होती.कधी शुगर ची औषध घ्यायची कधी चुकवायची यामुळं काकांची शुगर कधीच नियंत्रणात नसायची. बर्याच वेळेला त्यांची शुगर लेवल जास्तच असायची. आणी शुगर असणं म्हणजे शरीराला स्लो पाॅईझनिंग असल्यासारखं असतं. त्याच शुगर ने काकांच्या शरीरात स्लो पाॅईझनिंगच काम सुरु केलं होतं त्यांच्याच नकळतं. २०१२ ला काकांच्या छातीत दुखायला सुरु झालं म्हणुन ते बेळगांव ला दाखवायला गेले.तिथं ॲन्जिओग्राफी मधे त्यांना ३ ब्लाॅकेजीस असल्याचं दिसुन आलं तेंव्हा डाॅक्टरनी लगेच त्यांच्यावर ॲन्जीओप्लास्टी करुन जो मोठा ब्लाॅक होता तिथे तो ब्लाॅक दुर करुन स्टेण्ट बसवला. त्यानंतर दोन तिन वर्ष काकांना काही त्रास जाणवला नाही. पण पुन्हा २०१५ मधे ह्दयाचा त्रास जाणवु लागला. त्यांना धाप जाणवायला लागला. मधेमधे चक्कर येऊ लागली. म्हणुन काका पुन्हा बेळगावला गेले. यावेळच्या तपासणी मधे पुन्हा नविन ब्लाॅकेजीस तर आढळलेच शिवाय ह्दयाच पंम्पीग कमी झाल्याचं दिसलं. तेव्हा पुन्हा ॲन्जीओप्लास्टीचा निर्णय डाॅक्टरनी घेतला. काकांना ॲन्जीओप्लास्टी साठी थिएटर मधे घेतलं , ॲन्जीओप्लास्टी मधे स्टेण्ट घालायचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न अयशस्वी झाला त्यामुळे त्यांच्यावर ॲन्जीओप्लास्टी नाही होऊ शकली. तेव्हा डाॅक्टरनी त्यांना बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला मात्र काकांनी त्यासाठी नकार दिला. तेव्हा गरजेची औषधे घेऊन काका तिथुन परतले. पण काही दिवसांना पुन्हा त्रास होऊ लागला. कुणीतरी त्यांना” की होल” सर्जरीचा सल्ला दिला. म्हणुन ति सर्जरी करुन घेण्यासाठी ते गुजरात ला गेले. गुजरात मधे त्यांची “की होल ” सर्जरी झाली. आठदिवसांनी तिथुन डिसचार्ज घेऊन गावी परतले. “की होल “सर्जरीसाठी काकांच्या पायतील नसं कापुन ती ह्दयाला जोडली होती.घरी आल्यानंतर काही दिवसानी पुन्हा त्यांना ह्दयाचा त्रास जाणवु लागला. शिवाय पायाची नस कापली होती त्या जागेला शुगर मुळे इन्फेक्शन होऊन जखम झालेली होती व संपुर्ण पाय पण सुजला होता. म्हणुन मग ते जिल्ह्याच्या हाॅस्पीटल मधे ॲडमीट झाले. तिथे पुन्हा त्यांच्या पायातील जखमेतील घाण काढण्याकरीता गुडघ्याच्या दोन्हीबाजुला सहा सहा ईंचाच्या चिरा देऊन ते इन्फेक्शन कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्यांना न्युमोनियाची लागणं झाली. एकुणच सगळ्याच आजारांनी काकांच शरीर आणी मन ग्रासलं होतं. २५ दिवस काका त्या हाॅस्पीटल मधे उपचार घेत होते, रोज महागडी औषधे, सलाईन, ईन्जक्शन्स सगळ्या तर्हेने त्यांच्यावर वैद्यकिय उपचार चालु होते. काकांच्या शरीराला आणी शरीरासोबतच मनालाही प्रचंड वेदना होत होत्या. त्या जखमा ,ति शुगर, तो न्युमोनिया या सगळ्यात काकांचा जीव कासाविस होत होता.ते रोज देवाला प्रार्थना करायचे देवा जगणचं बास आता लवकरं मरण दे.

२५ दिवस हाॅस्पीटल मधे राहील्यानंतर थोडंफार बरं वाटु लागलं म्हणुन डाॅक्टरनी त्यांना डीसचार्ज दिला.काका घरी आले पण काकांच्या आजारपणावर फार काही सकारात्मक बदल झालेले नव्हते. उलट अजुन त्रास वाढला होता. काकांच्या गावाजवळ कवठेमहंकाळ गावात मिरजेतील प्रतिथयश
Dr. Yogesh Jamage यांच मोफत तपासणी शिबीर असल्याचं काकांना समजलं तेव्हा काकांनी विचार केला आता इतके डाॅक्टर केलेच आहेत तर यांना पण एकदा दाखवुन घेऊ म्हणुन ते शिबीरात आले.
Dr. Yogesh नी काकांना तपासलं आधीच्या औषधउपचारांबद्दल त्यांच्यकडुन जाणुन घेतलं तेव्हा डाॅ योगेश ना लक्षात आले की काकांच्या शरीरात पाण्याच प्रमाण हे गरजेपेक्षा जास्त वाढलेलं आहे. त्यांनी काकांना विचारलं त्यावर त्यांनी दिवसाला ४ ते ५ लिटर पाणी पित असल्याच सांगीतलं , त्यावर त्यांनी पाणी कमी प्या असे सांगीतले.शिवाय त्यांच ह्दयाचं पंम्पीग हे फक्त २० ते २५ % आहे.तेव्हा डाॅ योगेश नी त्यांना काही औषधं दिली व दिवसाला फक्त एक ते दीड लिटर पाणी प्यायचा सल्ला दिला. शिबीरातुन काका घरी आले. पण त्या दिवशीच काकांना प्रचंड अस्वस्थ जाणवु लागलं. आता जिवाच बरंवाईट होणार अशी स्थिती झाली. तेव्हा त्यांच्या मुलाने त्यांना काही मिनीटातच गावातल्या डाॅक्टराकडे नेले. तेव्हा गावातल्या डाॅक्टरनी तातडीने त्यांना मिरजेला मिशन हाॅस्पीटल मधे डाॅ योगेश जमगे यांच्याकडे घेऊन जायला सांगीतले व तसे डाॅ योगेश ना पेशंटच्या नाजुक स्थितीबद्दल कळवले. डाॅ योगेश काका पोहचण्याआधी आयसीयु मधे इमर्जन्सी किटसह तयार होते. अर्ध्यातासात त्यांच्या मुलाने त्यांना मिशन हाॅस्पीटल मधे आणले. डाॅक्टर योगेश नी त्यांना तपासले काकांच्या फुफुसाभोवती पाणी झालं होतं व शरीरात पाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले होते. शिवाय काकांना ventricular Tachycardia म्हणजेच ह्दयाचे ठोके अनियंत्रीत असल्याच निदान झालं म्हणुन ते नियंत्रणात आणण्यासाठी पहीला काही सेकंदातच डाॅ योगेशनी त्यांना शाॅक ट्रीटमेंट दिली व तत्परतेने गरजेची औषधे देऊन पहीला त्यांचे ह्दयाचं ठोके नियंत्रणात आणले . दोन तिन दिवस सलाईन व इन्जक्शन देऊन लघवीवाटे शरीरातील जास्त झालेल्या अनावश्यक पाण्याचं प्रमाण कमी केलं. दोन तिन दिवसातच काका सेटलं झाले
पुढे आठवडाभर डाॅ योगेशनी काकांच्या शरीरावर कुठलीही चिरफाड न करता फक्त योग्य वेळी योग्य निदान करुन निव्वळ योग्य औषधउपचार करुन त्यांची शुगर नियंत्रणात आणली, त्यांच्या ह्दयाचे ठोके नियंत्रणात आणले. शरीरातल्या पाण्याच प्रमाणं कमी केले .काका या सगळ्यामुळ काही दिवस नव्हे तर बरीच वर्ष अस्वस्थ जिवन जगत होते कितीतरी रात्री ते या वेदने मुळे तळमळत होते.पण आता मात्र त्यांना स्वत:ला खुप खुप बरं वाटतं होतं. आठ दिवसात काका डिसचार्ज घेऊन ठणठणीत होऊन घरी परतले. पुन्हा एकमहीन्यांनी काका फाॅलो अप साठी डाॅ योगेश जमगें कडे आले तेव्हा हसत हसत काका सांगत होते इतक्या वर्षात आता कुठे शांत झोप लागतीये. पुन्हा जगण्याची उर्मी वाटतीये. तुम्ही ते किती कमी वेळात केलतं आणी पुन्हा एक नविन आयुष्य दिलतं. खुप मोठ्ठा होशील बाळा असे हात जोडतं बोलुन ते डाॅ योगेश यांच्या केबीन मधुन बाहेर पडले.