रमेश काका पाहुण्यांच लग्न आटपुन नुकतेच घरी आले होते. त्या दिवशी रविवार होता शिवाय मदर्स डे पण,म्हणुन मदर्स डे सेलिब्रेट करण्याची त्यांच्या मुलीची घरात जय्यत तयारी चालु होती. मदर्स डे असला तरी आई बाबा दोघांनाही शुभेच्छा देऊन पंचपक्वान करायच्या लगबगीत होती ती.पण रमेश काकांना घरी आल्यापासुनच अस्वस्थ वाटतं होतं .. अधुन मधुन छातीत दुखत होतं ... पण मुलीच्या आनंदावर विरजण पडायला नको म्हणुन ते घरी काहीच बोलले नाहीत. असेच बसुन राहीले... रोज अगदी हसत खेळत असणारा बाबा आज एवढा शांत कसा ? असं जाणवतं होतचं त्यांच्या मुलीला... तिनं विचारलही बाबा काही होतयं का तुम्हाला? त्यावर त्यांनी त्यांच छातीच दुखण लपवत ,हसुनच सांगीतल तिला नाही काही होतं तु वाढ पटकन जेवायला मला. हसुन साजरं केलं तरी दुखण हळुहळु वाढतचं होतं त्यांच. हसत खेळत सगळ्यांची जेवणं झाली ,पण का आज बाबा मात्र शांतच होता.
रविवारचा दिवस सेलीब्रेट करायचा ठरला होता तरी बाबाच्या शांत शांत असण्याने सेलीब्रेशन ला मजा नाही आली. रमेश काकांना वाटत होतं लग्नातली दगदग , तिथलं जेवण यामुळे ॲसिडीटी झाली असेल.सोमवार उजाडला सकाळचा नाश्ता चहा झाला. पण अजुन काही काकांच छातीत दुखणं थांबलेलं नव्हतं म्हणुन थोडावेळ काका पडुन राहीले . मग आॅफीस ला निघुन गेले. पण तिथेही त्यांना अस्वस्थ वाटु लागल्याने घरी निघुन आले. एव्हाना दुपार झाली होती. मग थोडसं जेवण करुन काका टीव्ही पहात होते ,एवढ्यात रमेश काकांना अचानक जोरात उलटी झाली आणी ते तिथच चक्कर येऊन पडले. आता मात्र घरातले सगळे घाबरले. त्यांच्या बायकोने त्यांच्या चेहर्यावर पाण्याचे सपकारे दिले.. हळुहळु काका शुध्दीवर आले. त्यांना लगेच त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या फॅमीली डाॅक्टर कडे घेऊन गेले. डाॅक्टरनी त्यांची तपासणी केली. किरकोळ औषध उपचार केले व एक दिवस हाॅस्पीटल मधे ठेऊन घेतलं पण छातीत दुखणं काही थांबत नव्हतं तेव्हा डाॅक्टरनी सांगीतलं तुम्ही ह्दयरोग तज्ञांना दाखवा. तेव्हा कुणीतरी रमेश काकांना मिरजेत Dr. Yogesh Jamage या ह्दयरोग तज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे रमेश काका आणी त्यांच्या घरचे लोक मिरजेत डाॅक्टर जमगे हार्ट सेंटर मधे दुपारी दोन वाजता पोहचले. डाॅक्टर योगेश यांनी रमेश काकांना तपासले त्यांचा इको केला असता डाॅक्टर योगेश यांना लक्षात आले की दिड दिवसापुर्वी रमेश काकांना हार्ट ॲटॅक येऊन गेलाय. तसेच त्यांच्या ह्दयाची मुख्य रक्तवाहीनी ही १००% ब्लाॅक झालेली आहे. . आधीच हार्ट ॲटॅक येऊन दिड दिवस झालाय अजुन वेळ घालवला तर , एकतर त्यांच्या ह्दयाचं मसल फाटण्याची शक्यता होती किंवा त्यांच्या ह्दयाचं पंम्पींग कमी होण्याची शक्याता होती किंवा अचानक मृत्यु ओढावण्याची शक्यता होती. या सगळ्या शक्यता पाहता त्यांच्यावर तातडीने ॲन्जीओप्लास्टी करणं गरजेच होतं म्हणुन डाॅक्टर योगेश यांनी मिशन हाॅस्पीटलं ह्दयरोग विभागामधल्या स्टाफला तयारीत रहायला सांगीतले. डाॅक्टर योगेश रमेश काकांसह काही मिनीटातच मिशन हाॅस्पीटल मधे पोहचले. काकांना आॅपरेशन थिएटर मधे घेतलं आणी त्यांच्यावर डाॅक्टर योगेश जमगे यांनी त्यांच्यावर रेडीयल ॲन्जीओप्लास्टी केली. म्हणजेच कुठेही विनाछेद हाताच्या नसेतुन ॲन्जीओप्लास्टी केली .अथणीहुन दोन वाजता मिरजेत पोहचलेले रमेश काकां तिन वाजता ॲन्जिओप्लास्टी होऊन निवांत बाहेर आले होते. आता छातीत दुखणं नव्हत की अस्वस्थ वाटणं नव्हतं. दोन दिवसानंतर आता कुठे रमेश काकांना शांत झोप लागली होती. संध्याकाळी डाॅक्टर योगेश पेशंटचा फाॅलो अप घेत काकांच्या बेड पर्यंत आले. काकांचा चेहरा प्रसन्न दिसतं होता. डाॅक्टर योगेश हसतच त्यांना म्हणाले काकां ॲसीडीटी म्हणुन घरात बसलात. तो हार्ट ॲटॅक होता. याच्यापुढे आता असं दुर्लक्ष करु नका. तेव्हा काका म्हणाले. डाॅक्टर मालक तुम्ही असताना आता कशाला घाबरु मी हार्ट ॲटॅकला!!!!! तुमच्या सारखी आपुलकीची सेवा देणारा डाॅक्टर असेल तर हार्ट ॲटॅकनी काही बिघडु शकत नाही.!!!!!