माणसाच्या वयाच्या सत्तरी पंच्यात्तरी नंतर जर काही आजार उद्भवले तर आपण सहसा वयाचा विचार करुन व त्या वृध्द शरीराला त्रास नको यातना नकोत म्हणुन वैद्यकिय शस्त्रक्रिया , औषधांचे हेवी डोस शक्यतो टाळत असतो. व घरच्या घरी जर सेवा सुश्रुषा होत असेल व त्यातुंन त्या वृध्द व्यक्तीला आराम मिळत असेल तर आपण त्यांवर भर देत असतो.... आणी बर्याच वेळा सत्तरी पंच्यात्तरी ओलांडल्यावर या वृध्दांची सुध्दा गरज पडली तर हाॅस्पीटल मधे रहाणे उपचार घेणे याची मानसिकता नसते त्यांना घरी जास्त बरं वाटतयं अशी एक मानसिकता तयार झालेली असते. व बर्याच वेळेला रुग्णाचे वयोमान व आजारपण ही परिस्थिती पाहुन डाॅक्टर सुध्दा उपचार ,शस्त्र क्रिया साठी नको असे सांगतात.
परवा अशाच एक आज्जी
Dr. Yogesh Jamage यांच्या कडे आल्या म्हणजे त्यांचे नातेवाईक त्यांना जमगे हार्ट सेंटर मिरज येथे घेऊन आले. आज्जींच वय होतं अवघं ९० वर्ष - डाॅक्टर योगेश नी नातेवाईकांना आज्जींची प्राथमिक माहीती विचारली. आज्जीना तपासले. वयोमानाप्रमाणे त्यांच्या शरीरीला आजही बीपी , शुगर ही आधुनिक विशेषण लागु झालेली नव्हती. हां पण गेल्या दोन दिवसांपासुन त्यांच्या छातीत मात्र दुखत होतं....नव्वदी ला टेकलेली आई ...छातीत दुखतंय म्हणतीये म्हंटल्यावर तिच्या मुलांनी तिला गावातल्या डाॅक्टराना दाखवले तिथेच जुजबी उपचार केले... डाॅक्टरनी सांगितल ह्दयरोगा संबंधी काहीतरी वाटतयं ह्दयरोगतज्ञांकडे घेऊन जा... पण वयोमानाप्रमाणे गावापासुन ते शहरात ह्दयरोगतज्ञापर्यंतचा प्रवास झेपेल की नाही .... तिथले उपचारांना शरीर साथ देईल की नाही असे सगळे प्रश्न होते म्हणुन आज्जीच्या मुलांनी त्यांना घरीच देखभाल करत ठेवल. पण दुखणं काही थांबत नव्हतं आणी ते बघवतही नव्हतं म्हणुन शेवटी जे काय होईल ते बघु म्हणुन आज्जीना त्यांच्या मुलांनी डाॅ योगेश जमगे यांच्याकडे आणले. डाॅक्टर योगेश आज्जीना तपासत असताना त्यांच्या लक्षात आले की आज्जीना हार्ट अटॅकची लक्षणे होती म्हणुन तात्काळ त्यांनी इको , इसिजी केला तर डाॅक्टर योगेश यांचे निदान अचुक होते.... आज्जीना हार्ट अॅटॅक आला होता... तातडीने डाॅक्टर योगेश नी आज्जीना ॲन्जिओग्राफी ची गरज असल्याचे त्यांच्या मुलांना सांगितले तेव्हा त्यांचा होकार आल्यावर आज्जींची ॲन्जिओग्राफी केली त्या मधे त्यांच्या ह्दयात १००% ब्लाॅकेजीस आढळले....तेव्हा डाॅक्टर योगेश नी त्यांची ॲन्जीओप्लास्टी करायचे ठरवले व ९० वर्षांच्या आज्जींची डाॅक्टर योगेश जमगे नी आत्मविश्वासाने ॲन्जीओप्लास्टी केली व ब्लाॅकेजीच दुर केले....दोन दिवस आज्जी हाॅस्पीटल मधे राहिल्या आणी तिसर्या दिवशी डाॅक्टर योगेश नी पुन्हा त्याची तपासणी केली.... तेव्हा सगळे रिपार्ट्स नाॅर्मल..... आज आज्जींचा चेहरा परवा पेक्षा ताजा टिवटवीत आणी चिरतरुण दिसतं होता....डाॅक्टर योगेश नी तीन दिवसांनी त्यांना डिसचार्ज दिला व पंधरा दिवसांनी फाॅलोअप ला बोलावले....
पंधरा दिवसांपूर्वी ९० वर्षांची आज्जी जी स्ट्रेचर वरुन आली होती ती धाकड गर्ल आज फाॅलोअप ला स्वत:च्या पायानी आत्मविश्वासाने चालतं आली होती....आणी पुन्हा नाॅर्मल रिपोर्ट्स घेऊन पुन्हा एकदा चिरतरुण होऊन तिच्या घरी परतली...
आज्जीना शंभरी गाठायचीय...म्हणुन योग्य वेळेत योग्य निदानासहीत डाॅक्टर योगेश आज्जीना भेटले.