गुंजेगावची वंदना , तिला गेल्या ३ वर्षांपासुन पोटदुखीचा त्रास होता... अक्षरश: पोट दुखीने हैराण होती ती. पोट दुखीमुळे तीन वर्ष तिला व्यवस्थीत आणी पोटभर जेवता आलं नाही. जेवल्या नंतर अर्ध्या तासातच तिला पोट दुखुन त्रास उलट्या , जुलाब चालु व्हायचा. तीने ३ वर्षात ना फळ खाली होती ना फळांचा रस पिला होता, ना पालेभाज्या खाल्या होत्या ना कुठला आवडता पदार्थ मनसोक्त खाल्ला होता. त्यामुळं तीच वजनही वाढत नव्हतं , आणी पोट तर इतक दुखायच की तिची तळमळ घरच्यांना बघवत नव्हती. मग तेवढ्या पुरती औषध , इन्जक्शन घेऊन आठवडाभर बरं वाटायच,मग पुन्हा काही खाल्याचं निमित्त व्हायचं आणी पुन्हा पोटदुखी सुरु. वंदना च्या नवर्यानी वंदना ची मिरजेतील प्रसिध्द सर्जन डाॅक्टर विराज लोकुर यांच्याकडे तपासणी केली , तिच्या सोनोग्राफी मध्ये काही दोष आढळल्याने डाॅक्टर विराज लोकुर यांनी वंदना ला डाॅक्टर योगेश जमगे मिरज यांच्या कडे पुढील तपासणी करीता पाठवले. वंदना व तिचा नवरा Dr. Yogesh Jamage यांच्या जमगे हार्ट सेंटर मिरज येथे आले. Dr. Jamage यांनी वंदना ची तपासणी केली सोनेग्राफी केली , त्यामधे डाॅ योगेश यांना वंदना ला जठरासंबधी काहीतरी समस्या असल्याचे जाणवले म्हणुन त्यांनी वंदनाची पोटाची ( सिलियाक एन्जिओग्राफी )करायची ठरवली व ती ५ नोव्हेंबर २०१९ ला केली सुध्दा , त्या एन्जिओग्राफी मध्ये वंदना सिलियाक रक्तवाहीनी ब्लाॅक असल्याचे निदान झाले. व ती सिलियाक रक्तवाहीनी ब्लाॅक असल्याने तिच्या पोटा मध्ये रक्तपुरवठा सुरळीतपणे होत नव्हता . सिलियाक रक्तवाहीनी ही पोटातील जठर, आतडे, लिव्हर, आणी स्प्लिन या अवयवांना रक्त पुरवठा करते . सिलियाक रक्तवाहीनी ब्लाॅक असल्ल्यामुळे पोटा तिल अवयवांना रक्त पुरवठा कमी पडत होता त्यामुळे तिच्या पोटात दुखत असल्याचे डाॅक्टर योगेश यांना लक्षात आले. मग त्यांनी वंदनाच्या सिलियाक रक्तवाहीनीमधे रक्तपुरवठा सुरळीत होणे साठी एन्जिओप्लास्टी करायचे ठरवले, त्याप्रमाणे त्यांनी दि १६ नोव्हेंबर २०१९ ला सिलियाक एन्जिओप्लास्टी केली व व तिच्या सिलियाक रक्तवाहीनीचा रक्तपुरवठा व्यवस्थित सुरु झालां... तेव्हा पासुन वंदनाची पोटदुखी थांबली आणी वंदना व्यवस्थीत आणी पोटभर खाऊ पिऊ लागली. सिलियाक एन्जिओप्लास्टी यशस्वी रित्या भारती हाॅस्पिटल मध्ये महात्मा ज्योतीबा फुले आरोग्यदायी योजने अंतर्गत मोफत करण्यात आली ..वंदना जेव्हा डाॅ योगेश यांच्याकडे पुन्हा फाॅलोअप साठी आली तेव्हा ती आनंदाने डाॅक्टर योगेश ना सांगत होती.... तीन वर्षांनंतर मनसोक्त जगतीये मी आणी म्हणुनच तीन वर्षात न वाढलेलं वजन पंधरा दिवसात वाढलं